खंडोबाचीवाडी

असे सांगितले नाहीतर ज्याठिकाणी पाठीमागे पाहशिल त्याचठिकाणी मी माझे वास्तव्य करीन असे म्हणून भक्ताने ते कबूल केले व आपल्या एवढया दिवसाची तपश्चर्या पूर्ण झाली असे म्हणून तो आपल्या गावी परतला गावाच्या जवळ येताच आपण इतक्या लांब आलो आहे. आणि आपल्याबरोबर आपला देव पाठीमागून आला का नाही हे पाहून घेवूया का हे पाहण्यासाठी त्याने पाठीमागे वळून पाहिले पण देवाने सांगितल्याप्रमाणे न ऐकल्यामुळे देवाने त्याचठिकाणी वास्तव्य केले तेव्हापासून या गावास खंडोबाचीवाडी हे नामकरण झाले. आजअखेर त्या देवाचा या संपूर्ण परिसरात वावर आहे असे येथील भक्तांचा आत्मविश्वास आहे.