धार्मिक सांस्कृतिक

धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव-

  • चैत्र महिना सुरु होण्यापूर्वी गावातील लोकांना यात्रेचे वेड लागते. सदर गावाची यात्रा ही चैत्र पोर्णिमेला असते. यात्रेचे कार्यक्रम व वर्गणीबद्दल गावक-यांची बैठक बसते यात्रेनिमित्त बाहेरगावी असणारे लोक गावात परत येतात यात्रेनिमित्त भोजनास नातेवाईकांना एकत्रित बोलवतात. यात्रेमध्ये स्पर्धा व करमणूकीचे कार्यक्रम केले जातात. त्यामध्ये बैलगाडी स्पर्धा, कलापथक, सिनेमा व तमाशा इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गावात आजपर्यंत वैशिष्ट असे की कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी जातीय दंगल, अंतर्गत भांडणे, मारामारी होत नाही कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय कार्यक्रम पार पाडले जातात.
  • 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात. या राष्ट्रीय सणांना शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कसरतीचे प्रयोग करत असतात.