पुरस्कार

पुरस्कार-

  • जनगणनेबाबतीत गेले 40 वर्षापासून आजअखेर 1 ते 2 एवढी वाढ आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने भारत सरकारकडून जनगणना तपासणीपथक गावामध्ये आले त्यावेळी त्यांनी लोकसंख्या प्रमाणावर समाधान व्यक्त करुन गौरव उद्गार काढले.
  • गावाला सन 2005-06 साली विमा ग्राम पुरस्कार मिळाला आहे.
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते. सदर गाव हागणदारीमुक्त असल्याने निर्मल होणेच्या मार्गावर आहे. तंटामुक्त ग्राम अभियान चांगल्याप्रकारे राबविले जाते. संपूर्ण गाव हे रोगमुक्त आहे. कोणत्याही प्रकारचे साथीचे रोग पादुर्भाव अद्याप नाहीत गावात एकही खाजगी दवाखाना नाही त्याचबरोबर खंडोबाचीवाडी हे गाव नाबार्ड बॅंकेने विकासाच्या दृष्टीने सुधारणा करण्याच्या हेतूने गावाची संपूर्ण जिल्हयातून निवड केलेली आहे त्यादृष्टीने विकास कामे गावात चालू आहेत.